Gastric Problem in Stomach | पोटाच्या ‘या’ समस्येकडे दुर्लक्ष्य करू नका; अन्यथा भोगावे लागतील मोठे परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज- काल खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदललेल्या आहेत. लोकांची जीवनशैली देखील बदललेली आहे. धावपळीच्या जगात लोक घरातले अन्न खण्याऐवजी बाहेर रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन वेळ वाचवण्यासाठी जेवतात. त्याचप्रमाणे जे लोक नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरापासून लांब असतात. त्या लोकांना जास्त वेळ आणि उपलब्धता नसल्यामुळे ते बाहेरील अन्न खातात. परंतु या सगळ्याचा त्यांच्या आरोग्यावर नेहमीच गंभीर परिणाम होत असतो. कधी कधी लोकांना गॅस (Gastric Problem in Stomach) सारख्या अनेक समस्या होतात. त्याचा त्यांना खूप त्रास होतो. तुम्ही जर बाहेरचे अन्न खाल्ले, तर त्यामध्ये सोडा किंवा इतर काही पदार्थ वापरलेले असतात. त्यामुळे अन्नाची चव रुचकर लागते, परंतु यामुळे तुमच्या पोटात सतत गॅस निर्माण (Gastric Problem in Stomach) होतो. पोटात निर्माण होणारा गॅस ही अगदी सामान्य गोष्ट आहे, परंतु जर गॅसची समस्या जास्त वाढत असेल तर तुम्ही या गॅसवर तात्काळ उपचार घेतले पाहिजे. अन्यथा तुम्हाला अनेक मोठे आजारांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आज आपण गॅसच्या समस्यामुळे काय आजार होऊ शकतात हे पाहणार आहोत.

अन्न विषबाधा

आज-काल लोकांच्या खाण्याच्या पद्धती खूप बदललेल्या आहेत. त्यांना चायनीज, इटालियन हे पदार्थ जास्त आवडतात. त्याचप्रमाणे बाहेरील फास्ट फूड, तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला मोठा धोका निर्माण होतो. तुम्ही जर असे पदार्थ तुम्ही वारंवार खात असाल तर तुमच्या पोटात गॅस निर्माण होतो. तुमच्या पोटात सतत एका प्रकारचा वायू निर्माण होत असल्याने काही काळाने त्याचा एक स्टोन निर्माण होतो. आणि त्याचे तुमच्या पोटाला गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.

हृदयविकाराचा धोका | Gastric Problem in Stomach

आपल्या शरीरात कधी कधी गरजेपेक्षा जास्त गॅस तयार होतो. परंतु जर तो गॅस आपल्या शरीराबाहेर जात नसेल, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात उलट्या आणि जुलाब होतात. आणि त्या मार्फत हा गॅस बाहेर सोडला जातो. तुमच्या शरीरात जर दीर्घकाळ गॅस निर्माण होत असेल किंवा साचून राहत असेल, तर त्याचा तुमच्या थेट हृदयावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील असते

सकस आहार घ्या

तुम्हाला जर गॅसची समस्या नको असेल आणि इतर सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही रोज सकस आणि ताजे अन्न खाणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. अनेक गॅसयुक्त पदार्थ जरी आपण खाल्ले तरी सकाळी व्यायाम केला पाहिजे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, तर यामुळे तुमच्या शरीराला मोठा फायदा होणार आहे. परंतु तरीही तुमच्या शरीरामध्ये गॅसची समस्या निर्माण होत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे खूप गरजेचे आहे.