काँग्रेसला आणखीन एक धक्का!! गौरव वल्लभ यांचा पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरुवारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपण काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुख्य म्हणजे भाजपात प्रवेश करताना गौरव वल्लभ म्हणाले की, “काँग्रेस हा फार जुना राजकीय पक्ष आहे. ते आपल्या उद्देशापासून दूरावले गेले आहेत. ज्यावेळी मला पक्षात प्रवेश करायचा होता त्यावेळी अशा विचाराने गेलो की, तरुणांच्या विचारांना फार महत्त्व दिले जाते. पण असे काहीही नव्हते. पक्षात सध्या काहीही राहिलेले नाही. याशिवाय सर्व राज्यात काँग्रेसला खिंडार पडत आहे. सध्या पक्ष मजबूत विरोधकाची भूमिका साकारत नाही”

त्याचबरोबर, “अदानी आणि अंबानी देशातील बडे व्यावसायिक आहेत. त्यांना दोष देऊन काँग्रेसला काहीही मिळणार नाही. त्यांचा राजकरणाशी काहीही संबंध नाही. ते आपल्या व्यवसायामागे आहेत. पक्षाने आपल्या रणनितीमध्ये बदल करावा. मी असे राजकरण करू शकत नाही. यामुळेच पक्षातून बाहेर पडत आहे.” असा सल्ला देखील गौरव यांनी काँग्रेसला दिला.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत तीन राज्यांत काँग्रेसला तीन मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे राजस्थानचे वल्लभ आणि बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, पक्षातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे नेते संजय निरुपम यांनीही काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. सध्या संजय निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.