अदानींची गाडी सुसाट; बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांचे पॉकेट सध्या सुसाट आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानींनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता त्यांच्या समोर फक्त एलन मस्क यांचाच क्रमांक आहे

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता $155.5 अब्ज म्हणजेच सुमारे 12.37 लाख कोटी रुपये झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानीची एकूण संपत्ती $5.2 अब्ज म्हणजेच 3.49 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींनी फ्रेंच टायकून बर्नार्ड अर्नॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे.

जगातील ५ श्रीमंत व्यक्ती –

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इलॉन मस्क अजूनही 273.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे 154.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. लक्झरी वस्तूंचे निर्माते बर्नार्ड अर्नॉल्ट हे $153.6 अब्ज संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस $149.7 अब्ज संपत्तीसह चौथे आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स $105 च्या संपत्तीसह जगातील पाचव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.