व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात आज बैलाच्या वाढदिवसानिमित्त नाचणार गौतमी पाटील

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
हौसेला मोल नसत असं म्हणतात हे खरं आहे. अशीच हौस एका बैलगाडा मालकाने आपल्या बैलाच्या वाढदिवशी पूर्ण करण्याची ठेवली आहे. त्याने आपल्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम ठेवला आहे.

साताऱ्यात आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळणार आहे. जावली तालुक्यातील खर्शी येथे प्रसिद्ध बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील खोजेवाडी गावात पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास गौतमी पाटील हिने लावणी सादर केली. त्यानंतर आता एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडत असल्यामुळे याची चर्चा परिसरात चांगलीच होत आहे.