GBS Update : महत्वाची बातमी ! मुंबईत GBS मुळे पहिला मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांची संख्या 8 वर

0
1
GBS mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

GBS Update : महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत राज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, यातील बहुतेक रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, आता मुंबईत पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे (GBS Update) मृत्यू झाला.

पहिला मृत्यू मुंबईत, वाढते टेन्शन (GBS Update)

मुंबईतील वडाळा येथील रहिवासी असलेले 53 वर्षीय रुग्ण बीएमसीच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण दीर्घकाळापासून आजारी होते व त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील जीबीएसमुळे झालेला हा पहिला मृत्यू असून, यामुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नायर रुग्णालयात 16 वर्षीय मुलीवर उपचार सुरू

जीबीएसने मुंबईत पहिला बळी घेतल्यानंतर, त्याच नायर रुग्णालयात 16 वर्षीय मुलगी उपचारासाठी दाखल आहे. पालघरची रहिवासी असलेल्या या मुलीला काही दिवसांपूर्वी जीबीएसची लक्षणे दिसून आली होती. ती सध्या दहावीमध्ये शिकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची प्रकृती स्थिर असून उपचार (GBS Update) सुरू आहेत.

पुण्यात 7 मृत्यू, रुग्णसंख्या 192 वर

महाराष्ट्रातील जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. रविवारी (9 फेब्रुवारी) एका 37 वर्षीय व्यक्तीचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 7 वर पोहोचला. यामध्ये पुष्टी झालेल्या व संशयित प्रकरणांचा समावेश आहे. पुण्यात GBS रुग्णांची एकूण संख्या 192 झाली आहे, त्यापैकी 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या आकडेवारीमुळे प्रशासनावर ताण वाढला असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईत पहिल्या GBS मृत्यूने राज्यातील एकूण मृतांची संख्या 8 वर गेली आहे. पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या आजाराचा प्रसार वाढत आहे. नागरिकांनी आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच लक्ष देण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

GBS (गुईलेन-बॅरे सिंड्रोम) बाबत घ्यावयाची काळजी

लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या
GBS हा न्यूरोलॉजिकल विकार असून, यामध्ये शरीरातील स्नायूंवर आणि नर्व्ह सिस्टमवर परिणाम होतो. याची लक्षणे ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्याहातापायात कमजोरी किंवा बधिरपणा
चालण्यास त्रास होणे
श्वास घेण्यास त्रास
स्नायूंमध्ये वेदना किंवा ताकद कमी होणे

संसर्गापासून बचाव

GBS बहुतेक वेळा संसर्गानंतर (व्हायरल किंवा बॅक्टेरियल) होतो. यासाठी:
हात वारंवार साबणाने धुवा.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
आहारात पोषक तत्वांचा समावेश करा जेणेकरून प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी वापरा.

जर लक्षणे दिसू लागली तर:

त्वरित न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.
योग्य निदान आणि इम्युनोग्लोब्युलिन थेरपी (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्सचेंज उपचार सुरू करा.
श्वसनाच्या त्रासासाठी व्हेंटिलेटरचा उपयोग आवश्यक असेल तर दिरंगाई करू नका.

लसीकरण

GBS काहीवेळा इन्फेक्शन किंवा लसीकरणानंतर होऊ शकतो, पण त्यामुळे लसीकरण थांबवू नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य लसीकरण करून घ्या.

ताण आणि थकवा टाळा

GBS रुग्णांना आरामाची आणि योग्य पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे:

पुरेसा झोप आणि आराम घ्या.
मानसिक ताण कमी करा.

आहाराचा विशेष विचार

GBS च्या रुग्णांनी आहारात प्रथिने, व्हिटॅमिन बी12, आणि मॅग्नेशियम यांचा समावेश करावा.
हिरव्या भाज्या, डाळी, फळे खा.
जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.

डॉक्टरांचा संपर्क ठेवा:

नियमित फॉलोअप करणे आवश्यक आहे.
कोणतीही नवीन समस्या दिसल्यास त्वरित डॉक्टरांना माहिती द्या.
GBS हा गंभीर आजार असला तरी वेळीच निदान आणि उपचार घेतल्यास बरे होण्याची शक्यता जास्त आहे. योग्य काळजी आणि उपचारांनी जीवनशैली सामान्य होऊ शकते.