औरंगाबाद – कोरोना महामारीमुळे मागील वर्षी २० मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले आणि सर्व सेवा ठप्प झाल्या त्यामुळे रेल्वेचे देखील चाके रुतली त्यानंतर जुन महिन्यात हळूहळू रेल्वे काही प्रमाणात सुरु झाली. औरंगाबादहून देखील १ जून पासून नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. परंतु ती रेल्वे अजूनही आरक्षित तत्वावर धावत आहे. त्यानंतर हळूहळू अर्ध्या रेल्वे आजघडीला पूर्ववत सुरु झाल्या आहेत. परंतु या सर्व रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाश्यांना आरक्षण करून प्रवास करावा लागत आहे. यामुळे काही प्रमाणात रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आळा बसला असला तरी प्रवाश्यांना मात्र याचा त्रास होत होता. परंतु आता प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता २४ ऑगस्ट पासून काही ठराविक रेल्वेमध्ये अनारक्षित प्रवास करण्यास परवानगी दिल्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे प्रवाश्यांना तब्बल ५२० दिवसांनी रेल्वेचे जनरल तिकीट घेऊन प्रवास करता येत आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातून लॉकडाऊन पूर्वी दररोज सुमारे ४० ते ५० रेल्वे धावत होत्या. परंतु आता लॉकडाऊन नंतर यातील बहुतांश रेल्वेसेवा पूर्ववत सुरु झाल्या आहे. परंतु यासर्व रेल्वेमध्ये तिकीट आरक्षित करूनच प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव आणि प्रवाश्यांचा वाढता प्रतिसाद बघून रेल्वे प्रशासनाने आता ठराविक रेल्वेमध्ये अनारक्षित जनरल तिकीट काढून प्रवास करता येत आहे. यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच प्रवाश्यांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नांदेड ते रोटेगाव अनारक्षित डेमो पॅसेंजर या महिन्यात सुरु केली आहे. या डेमो पॅसेंजरला प्रवाश्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
खालील रेल्वेमध्ये करता येईल अनारक्षित प्रवास –
नरसापूर – नागरसोल -नरसापूर विशेष एक्सप्रेस, औरंगाबाद – रेणीगुंटा – औरंगाबाद साप्ताहिक एक्सप्रेस, नांदेड – औरंगाबाद – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस, औरंगाबाद – हैदराबाद – औरंगाबाद विशेष एक्सप्रेस, आदी गाड्यांमध्ये प्रवाश्यांना आता जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.
सध्या सुरु असलेल्या रेल्वे –
नरसापूर – नागरसोल -नरसापूर विशेष एक्सप्रेस, औरंगाबाद – रेणीगुंटा – औरंगाबाद साप्ताहिक एक्सप्रेस, नांदेड – औरंगाबाद – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस, औरंगाबाद – हैदराबाद – औरंगाबाद विशेष एक्सप्रेस, नांदेड – अमृतसर – नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, नांदेड – मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस, नांदेड – मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, आदिलाबाद – मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, जालना – मुंबई – जालना जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस, धर्माबाद – मनमाड – धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस, हैदराबाद – जयपूर – हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेस, साईनगर शिर्डी – तिरुपती – साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस, साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी – सिकंदराबाद – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी – विजयवाडा – साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस, साईनगर शिर्डी – विशाखापट्टणम – साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्सप्रेस, सिकंदराबाद – मनमाड – सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस, नांदेड – पुणे – नांदेड द्विसाप्ताहिक एक्सप्रेस, नांदेड – रोटेगाव – नांदेड डेमो पॅसेंजर