मोदींच्या ‘या’ योजनेद्वारे मिळणार फ्री शिलाई मशीन; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार अशा अनेक योजना ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळतो. त्यातच आता सरकारने महिलांसाठी पंतप्रधान मोफत सिलाई मशीन योजना आणली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवून त्यांना समाजात सक्षम बनवणे हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना फक्त नोंदणी करावी लागेल आणि कोणतेही पैसे न देता त्यांना शिलाई मशीन मिळेल. ही योजना प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांच्या सोयीसाठी आली राबवण्यात आली आहे.

पीएम फ्री सिलाई मशीन योजना देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी देत ​​आहे. या योजनेअंतर्गत 20 ते 40 वयोगटातील महिला अर्ज करून फ्री मध्ये शिलाई मशीन मिळवू शकतात. या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण अशा सर्व महिलांना होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, अपंगांसाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र आणि विधवांसाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अर्ज कसा करायचा?

प्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जावे लागेल.

येथे तुम्हाला फ्री शिलाई मशीनसाठी अर्ज डाउनलोड करावा लागेल

तुम्हाला तुमची सर्व माहिती फॉर्ममध्ये भरावी लागेल

सर्व कागदपत्रे आणि तुमचा फोटो लावावा

त्यानंतर संबंधित कार्यालयात जाऊन हा फॉर्म सबमिट करा

एक गोष्ट लक्षात ठेवा की योजनेची लाभपत्रे मिळविण्यासाठी, तुमच्या अर्जानंतर सरकार ते तपासेल. अर्ज सबमिट केल्यानंतर, कार्यालयातील अधिकारी तुमच्या पत्राची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.