सरकारची जबरदस्त स्कीम!! गोल्डन कार्ड काढा अन् 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा मिळवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) आणि महात्मा फुले जन आरोग्य (Mahatma Phule Jan Arogya Yojana) योजनेअंतर्गत पाच लाखांरुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. परंतु त्यासाठी प्रत्येक एका लाभार्थीकडे आयुष्मान गोल्डन कार्ड (Golden Card) असणे आवश्यक आहे. या गोल्डन कार्डमुळे लाभार्थ्याला कर्करोग, बायपास सर्जरीसह 1 हजार 365 आजारांवर मोफत उपचार घेता येऊ शकतात. हे कार्ड सरकार सेवा केंद्र आणि सेतू सुविधा केंद्रातून लाभार्थी काढून घेऊ शकतात. लक्षात ठेवा की हे कार्ड लाभार्थीकडे असल्यास त्याला योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येऊ शकतात.

योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण?

या योजनेसाठी पिवळे रेशनकार्ड, अंतोद्‌य व अन्नपूर्णा योजनेतील शिधापत्रिकाधारक, केशरी रेशनकार्डधारक, शासकीय अनाथालयातील विद्यार्थी, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, हे उपचारासाठी पात्र ठरतात. याच्याबरोबर, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांचे कुटुंब, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडील नोंदणीकृत कामगार आणि कुटूंब ही पात्र असतील.

कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
शिधापत्रिका
मोबाईल नंबर
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो

आयुष्यमान भारत योजना, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब आणि गरजू कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतो.