भारतातील हा किल्ला लांबून दिसतो अन् जवळ जाताच गायब होतो!! गावकऱ्यांवर आजही भीतीचे सावट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील हजारो किल्ले स्थापित आहे. परंतु यातील गडकुंदरचा किल्ला (Gharkundal Fort) अतिशय रहस्यमय असल्याचे आजवर सांगण्यात आले आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशातील झाशी येथे वसलेला आहे. या किल्ल्यावर जायला देखील लोक घाबरतात. कारण की हा किल्ला भुतांनी पछाडलेला आहे असे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. खरे तर, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये देखील या किल्ल्याविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मोजक्याच माहितीवर सर्वजण विश्वास ठेवतात.

असे म्हटले जाते की, हा किल्ला अकराव्या शतकात बांधण्यात आला होता. या किल्ल्यात एकूण पाच मजले आहेत. परंतु यातील तीन मजले किल्ल्यावरती दिसतात. तर इतर दोन मजले जमिनीखाली बांधलेले आहेत. गावकऱ्यांच्या मध्ये हा किल्ला 1500 ते 2000 वर्षे जुना आहे. हा किल्ला भुलभुलैयासारखा बांधण्यात आला होता. त्यामुळे या किल्ल्यात प्रवेश करणारा प्रत्येकजण गोंधळून जातो. अनेकजण तर या किल्ल्याच्या आतमध्येच अडकून बसतात.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, गडकुंदर किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून दिसतो. परंतु जसजसे या किल्ल्याच्या जवळ जाईल तस तसे हा किल्ला दिसत नाही. तसेच, या किल्ल्यावर तुम्ही रस्त्याच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. कारण, किल्ल्यावर पोचण्याचा मार्ग देखील वेगळा आहे. त्यामुळे सहसा या किल्ल्यावर कोणीही जात नाही.

गडकुंदर किल्ल्याविषयी बोलताना स्थानिक लोक सांगतात, एकदा या किल्ल्याजवळून मिरवणूक गेली होती. त्यावेळी 50 ते 60 लोक या किल्ल्यावर गेली होती. परंतु ही लोक पुन्हा परत आली नाही. असे म्हणतात की या किल्ल्यावर हिरे आणि सोने लपवण्यात आले आहेत. यामुळे अनेकजण हे सोने शोधण्यासाठी किल्ल्यावर येतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला येथे वेगवेगळा भास होतो.