घाटी परिचारीकांचे काम बंद आंदोलन; आश्वासनानंतर 2 तासांनी पुन्हा कामावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात आज परिचारिकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे सकाळीच घाट येथील रुग्ण सेवा विस्कळीत झाली होती. परंतु घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाने धाव घेत परिचारिका बरोबर संवाद साधून त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिले त्यामुळे दोन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

घाटी रुग्णालयातील औषध टंचाई, वार्डात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा असलेला अभाव, स्वच्छता यामुळे रुग्ण सेवा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासनाला वारंवार सांगूनही हे प्रश्न सुटत नसल्याने अखेर परिचारिका संघटनेने आज सकाळी साडे सात वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारले. यानंतर घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उप अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास कडप्पा वैद्यकीय अधीक्षक डॉ. काशिनाथ चौधरी डॉ. विकास राठोड यांनी धाव घेत परिचारिका बरोबर संवाद साधून मागण्या संदर्भात आश्वासन दिले.

येणाऱ्या पंधरा दिवसात परिचारिकांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन यावेळी घाटी प्रशासनाने दिले. त्यामुळे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे परिचारिका संघटनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त, सचिव इंदुमती थोरात व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment