Gig Workers Pension Schemes : ओला-उबर चालक, डिलिव्हरी बॉय, आता सर्व पेन्शनचे हक्कदार! श्रम मंत्रालयाकडून माहिती जाहीर

0
1
gig workers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gig Workers Pension Schemes : देशात आता गिग वर्कर्सच्या अंतर्गत येणारे ओला-उबर चालक, झोमॅटो-स्विगी डिलिव्हरी बॉय, रस्त्यावरील विक्रेते आणि कंत्राटी कामगार असलेल्या रोजंदारी मजुरांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये एक कोटी गिग वर्कर्सना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य लाभ मिळाल्यानंतर सरकार आता पेन्शन योजनेचाही लाभ देणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये आता पार्ट टाइम जॉब करणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि ओला-उबरच्या चालकांनाही (Gig Workers Pension Schemes) पेन्शनचे पैसे मिळणार आहेत.

श्रम मंत्रालय गेल्या एक वर्षापासून या योजनेवर काम करत आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालय लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून गिग आणि प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन लाभ देण्यासाठी एक धोरण मोदी मंत्रिमंडळात मांडणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आता ओला, उबरसोबतच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर प्रत्येक व्यवहारावर काही टक्के सामाजिक सुरक्षा अंशदान कापणार आहे. यासाठी श्रम मंत्रालय लवकरच ही पेन्शन योजना (Gig Workers Pension Schemes) आणण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मागेल.

पेन्शन योजनेचा लाभ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने एक कोटी गिग वर्कर्ससाठी पीएम स्वनिधी योजनेसारखी योजना नवीन रूपात आणत सोशल सिक्योरिटी स्कीमअंतर्गत ई-श्रम पोर्टलमध्ये समाविष्ट केले होते. मोदी सरकार आता गिग वर्कर्ससाठी 30,000 रुपयांचे UPI-लिंक्ड क्रेडिट कार्डही जारी करणार आहे. गेल्या वर्षीच श्रम मंत्रालयाने एक ड्राफ्ट तयार करून आर्थिक मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे (Gig Workers Pension Schemes) पाठवला होता.

कोण आहेत गिग वर्कर्स ?

गिग वर्करमध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारे बहुतेक श्रमिक स्वतंत्रपणे कंत्राटी कर्मचारी असतात. यामध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणारे लोक, डिलिव्हरी सेवा, टॅक्सी सेवा, कॉलवर दुरुस्तीचे काम करणे यांसारख्या अनेक सेवांचा समावेश होतो. भारतात सध्या या क्षेत्रात लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फूड डिलिव्हरी करणारे किंवा ओला-उबर टॅक्सी चालवणारे लोक गिग कर्मचारी (Gig Workers Pension Schemes) मानले जातात.