Ginger Cultivation | आलं हे एक अतिशय फायदेशीर असे कंदमुळ आहे. आल्याचा चहा देखील अनेकांना आवडतो. परंतु आल्याची लागवड कशी केली जाते? याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. खूप कमी राज्यांमध्ये आल्याची लागवड होते. आजकाल लोक अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात. आले (Ginger Cultivation) हे एक औषधी आहे. अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात . त्याचप्रमाणे आल्यापासूनच सुंठ बनवली जाते. आले सुकवून ही सुंठ बनवली जाते. सुंठीचा भाव आल्यापेक्षाही जास्त असतो. आल्याची वर्षभर बाजारात मागणी राहते. त्यामुळे त्याचे भावही नेहमीच जास्त असतात. आणि शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. आल्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन सी, मॅग्नीज इत्यादी गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता देखील असते. परंतु आल्याची शेती (Ginger Cultivation) नक्की कशी केली जाते ?याबद्दल अजूनही कोणाला माहित नाही. तर आज आपण आल्याची लागवड कशाप्रकारे केली जाते हे पाहणार आहोत.
अशा प्रकारे आल्याची लागवड करा | Ginger Cultivation
आले पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी, वालुकामय चिकणमाती माती सर्वोत्तम मानली जाते. मातीचा पीएच 5.5 ते 6.5 दरम्यान चांगला मानला जातो. आले लागवडीसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते. आल्याचे शेत तयार करण्याचे काम एप्रिलमध्ये केले जाते आणि मे महिन्यात शेतातील माती रोटाव्हेटरच्या सहाय्याने कुस्करली जाते.
शेतात शेणखत वापरावे
चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत आणि कडुलिंबाची पेंड शेतात टाकून जमिनीत चांगले मिसळावे. त्यानंतर जमीन सपाट करावी. यानंतर, लहान वाफ्यात विभागून एक हेक्टरमध्ये आल्याची लागवड करायची असेल, तर तुम्हाला 2 ते 3 क्विंटल आले बियाणे लागतील. दक्षिण भारतात आल्याची पेरणी एप्रिल किंवा मे महिन्यात केली जाते आणि पेरणीनंतर सिंचन केले जाते.
एका हेक्टरमध्ये एवढे उत्पादन घेता येते
आले लागवड बियाणे पेरल्यानंतर 8.5 ते 9 महिन्यांनी पूर्णपणे पिकते. आले पीक पूर्ण पक्व झाल्यावर झाडाची वाढ थांबते आणि पीक पिवळे पडून सुकायला लागते. एक हेक्टरमध्ये 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते.
एक एकर जमिनीत आल्याची लागवड करायची झाल्यास 1.20 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एक किलो आल्याचा भाव 40 रुपयांपर्यंत राहतो, कधी कधी यापेक्षाही जास्त असतो, पण एक किलो आल्याचा बाजारभाव 40 रुपये मोजला, तरीही शेतकरी साडेतीन ते चार लाख रुपये कमावतो.