‘स्पायडरमॅनची बहीण मिळाली..’; झपाझप भिंत चढणाऱ्या मुलीचा Video तुफान व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रोज सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेले पाहत असतो. यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. आता देखील याच सोशल मिडीयावर एक कमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज देखील मिळत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी जिचे वय साधारण १२-१३ वर्षे असेल ती झपझप भिंतीवर चढताना दिसत आहे. तिची ही कलाकृती पाहून आपल्याला स्पायडरमॅनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला स्पायडरमॅनची बहीण असेच नाव दिले आहे.

या लहान मुलीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील pandiyarajan1219 अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळाले आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांनी तिचे कौतूक केले आहे. तर काहींनी यात काही खास गोष्ट नाही अशा देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर, या लहान मुलींला नेटकऱ्यांनी सुपर वुमन अशी देखील उपमा दिली आहे.  या मुलीचा असा झपाझप भिंत चढतानाच व्हीडिओ पाहून तुमचीही बोट आपोआप तोंडात जातील हे मात्र नक्की. इतक्या आरामात हि चिमुकली स्पायडरमॅन सारखी भिंत कशी काय चढू शकते हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात निर्माण होईल.

दरम्यान यापूर्वी देखील सोशल मिडीयावर लहान मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओंना देखील नेटकऱ्यांनी भरभरुन दाद दिली आहे. लहान मुलांची दोरीवरील कसरत असो किंवा त्यांचे या वयात उत्तमरित्या स्केटींग खेळणे असो. अशा व्हिडीओमार्फत मुलांचे कौशल्य जगासमोर येत आहे. सोशल मिडीयामुळे अनेक टॅलेंटेड व्यक्ती जगासमोर येत आहेत. त्यामुळे सोशल मिडीया नक्कीच फायद्याचे ठरत असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.