स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा नराधम दारुड्या बापास न्यायालयाने आज सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सयाप्पा भगवान गडदे असे शिक्षा झालेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. अवघ्या एका वर्षाच्या आत हा निकाल लागला आहे. आरोपी सयाप्पा गडदे हा त्याच्या पत्नी व इयत्ता बारावीस शिकणाऱ्या मुलीसह हमालवाडी येथे रहात होता. तो हमाली करीत असे. त्याला दारुचे व्यसन होते. यामुळे वारंवार भांडणे होत असत. सयाप्पाची पत्नी ही कामाला जाऊन घरखर्चास हातभार लावत होती. मे २०१६ मध्ये सयाप्पाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार समजताच नातेवाईकांनी त्यास समज दिली होती.

त्यानंतर काही दिवस सयाप्पा व्यवस्थित राहत होता. मात्र पुन्हा जून २०१७ मध्ये त्याने रात्री दारु पिऊन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करुन स्वत:ची सुटका करुन घेतली होती. यानंतर देखील घरात वाद झाला होता. पुन्हा २६ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्रीच्या वेळी सयाप्पा रात्री पुन्हा दारु पिऊन आला. त्यावेळी त्याची पत्नी व मुलगी झोपलेली होती. मद्यधुंद अवस्थेतच त्याने मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिडलेल्या मुलीने जवळच पडलेली फरशी त्याच्या डोक्यात मारली व आपली सुटका करुन घेतली. मात्र सयाप्पाने घरातील कुऱ्हाड घेऊन मुलीच्या हातावर व डोक्यावर वार केले. मुलगी जीव वाचविण्यासाठी घरातून बाहेर पडून पळू लागली. आरोपी सयाप्पा देखील कुऱ्हाड घेऊन तिच्या मागे लागला. पत्नीने सयाप्पाला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तीला शिवीगाळ केली. व स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली.

दरम्यान पत्नीने मुलीला घेऊन थेट कुपवाड पोलीस ठाणे गाठले आणि सयाप्पाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सयाप्पास अटक केली. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्ती पांडुरंग भोसले यांनी आरोपी सयाप्पा गडदे यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली

Leave a Comment