10 मुले जन्माला घाला, 13 लाख मिळवा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अजब घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को : वृत्तसंस्था – रशिया आणि युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध धुमसत आहे. देशावर युद्ध संकट असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे देशातील घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. देशातील लोकसंख्या वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी अत्यंत धक्कादायक अशी घोषणा केली आहे. 10 मुले जन्माला घाला आणि 13 लाख मिळवा अशी वादग्रस्त ऑफर त्यांनी रशियातील महिलांना दिली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्यावर सर्व स्थरातून टीका केली जात आहे. तरीदेखील ते आपल्या घोषणेवर ठाम आहेत.

का दिली हि ऑफर?
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्या सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. दहा मुलांना जन्म देऊन त्यांच्या संगोपणासाठी सरकार या मातांना 13.5 हजार पौंड म्हणजेच 13 लाख रुपये देणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशात लोकसंख्येचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुतिन यांनी थेट महिलांना दहा मुलांना जन्माला घालण्याच्या बदल्यात भरमसाठ मोबदल्याची ऑफर दिली आहे.

महिलांना ‘मदर हिरोईन’ अवॉर्डने सन्मानित करणार
ज्या महिला दहा मुलांना जन्माला घालतील तसेच त्यांना जिवंत ठेवतील अशा मातांना ‘मदर हिरोईन’ असा अवॉर्ड देण्यात येणार आहे. ‘मदर हिरोईन’ योजनेअंतर्गत या मातांना 13 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. रशियन फेडरेशनची (Russian President Vladimir Putin) नागरिक असलेल्या महिलांनाच या पुरस्काराचा लाभ मिळणार आहे. तसेच एखाद्या मातेने आपत्कालीन परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यात आपले मूल गमावले, तरीही संबधीत महिला या पुरस्काराची पात्र असल्याचे सरकारी निर्देशात म्हंटले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर