सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आजादी का अमृत महोत्सव प्रत्येक भारतीयांनी साजरा केला. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज लावून गर्भ र्श्रीमंता पासून पेढ्या-पिढ्या आर्थिक, दुर्लभ घटकांनी देखील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. मोठ्या-मोठ्याले महाल, राजवाडे, बंगले सर्व सामान्यांची घरे आणि वंचित समाजयांच्या पालावर सुद्धा तीन दिवस राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत होता. भारताच्या पंतप्रधानांचे अभिवचन आहे की कोणतीही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही. मग असे असताना देखील भटके विमुक्तनी वर्षानुवर्षे स्वतःला घर नाही म्हणून फक्त भटकंती करायची का?
भटके विमुक्तांनी एखाद्या गावात माळ रानावर ओढ्या नाल्यावर कोणतेही शासकीय जागेत स्थिर होण्याचा प्रयत्न केला. तर स्थानिक गावगुंड, टगे त्यांना हिसकावून लावतात. जागा जरी शासकीय असली तरी गावटग्यांना ती आपलीच आहे. व ती आपल्यालाच मिळावी असे वाटते. म्हणून असे लोक भटके विमुक्तांना कायम अस्थिर करत असतात. नेमके याच कारणामुळे भटके विमुक्तांना व त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण, चांगले अन्न मिळत नाही, चांगला निवारा देखील मिळत नाही. कित्येक वर्ष हा समाज अंधारात खितपत पडलेला आहे. माणूस म्हणून आपल्याला कोणता अधिकार आहे, ते समजला आज पर्यंत उमगले नाही. शासनाला व प्रशासनाला या गोष्टीचे काही स्वैरसुतक नाही. आमची आपणास मुख्य मागणी आहे. प्रथम यांना स्थिर करून म्हणजे त्यांना त्यांच्या शासकीय जागा उपलब्ध करून द्या. तत्पूर्वी त्यांना जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला व मतदान ओळखपत्र ही सर्व कागदपत्रे त्यांना एका खिडकी योजना अंतर्गत आपल्या कार्यालयात उपलब्ध करून द्या.
महाराष्ट्राचा विचार न करता फक्त सातारा जिल्ह्याचा विचार केला तर शहरासकट प्रत्येक गावात धन दांडगे आणि गावटगे यांच्याकडे शासकीय जमीन (उदा. गायरान देवस्थान इ.) यांच्या ताब्यात आहेत. ज्या- ज्या ठिकाणी भटके विमुक्त समाज राहतोय. त्या गावातील काही गुंठे शासकीय जागा सदर समाजाला उपलब्ध केल्यास त्यांच्या हक्काची घरे त्यांना मिळतील. गेले दोन ते चार वर्षापासून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आम्ही आपल्या कार्यालयाकडे आणि अनेक आंदोलनाच्या माध्यमातून भटके विमुक्तांना घरांसाठी जागा मिळणे बाबत दाद मागितली आहे. मात्र आज पर्यंत आपण कार्यालयामार्फत सदर समाजाला घरासाठी जागा देणे करता, कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरी या निवेदनाचा विचार करून त्यांच्या घरासाठी शासकीय जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विजय गायकवाड सातारा जिल्हा सह पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी सातारा यांनी निवेदना मार्फत केली आहे.
सदर वेळी युवा जिल्हाध्यक्ष करण गायकवाड, युथ सातारा शहर अध्यक्ष सुशांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघमारे, खंडाळा तालुका अध्यक्ष अरुण दादा गायकवाड, खटाव तालुका अध्यक्ष प्रशांत किर्तीकर, कामगार आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष देवा भोसले, युथ जिल्हा उपाध्यक्ष रणजीत कसबे, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका ताई भोसले, शिरवळ शहराध्यक्ष सीमा बनसोडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.