Give Plastic And Take Gold : ‘प्लास्टिक द्या आणि सोने घ्या’, प्लास्टिक मुक्तीसाठी ‘या’ गावाने सुरु केली अनोखी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Give Plastic And Take Gold : सध्याच्या काळात सोन्याच्या किमतीने सर्वोच्च पातळी गाठली आहे. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागत आहेत. काही लोकं घालण्यासाठी तर काही गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. मात्र जरा विचार करा की, जर कचऱ्याच्या बदल्यात आपल्याला सोने मिळले तर… होय, आता असे प्रत्यक्षात घडते आहे. भारतात असेही एक गाव आहे जिथे कचरा देऊन सोने मिळत आहे. तसेच जेव्हा ही बाब जाहीर केली गेली त्यानंतर अवघ्या काही वेळातच तिथला कचराच संपला.

प्लास्टिक दो, सोने का सिक्का लो: जम्मू कश्मीर के गांव की प्लास्टिक प्रदूषण  से निपटने की अनोखी पहल

वास्तविक, सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. या गावाचे नाव सदिवारा असे असून काही काळापूर्वी या गावच्या सरपंचाने प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी जाण्यासाठी ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. या गावचे सरपंच फारुख अहमद गणई यांना आपले गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे. व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी यासाठी अनेक प्रयत्न देखील केले. मात्र, त्यांना फारसे यश मिळाले नाही. तसेच, यावेळी त्यांनी सुरु केलेल्या मोहीममुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. Give Plastic And Take Gold

पॉलीथीन लाओ, सोना पाओ, कचरे के बदले सोने का सिक्का देता है यह सरपंच, ताकि  गांव को बना सके वेस्ट-फ्री - jammu kashmir sarpanch unique initiative  giving gold for plastic waste -

‘प्लास्टिक द्या आणि सोने घ्या’

मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील सरपंच असलेले फारुख अहमद गणई यांनी ‘प्लास्टिक दो और सोना लो’ नावाची एक मोहीम सुरू केली होती. या योजनेंतर्गत जो कोणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा देईल त्याला पंचायतिकडून सोन्याचे नाणे मिळेल. याचा परिणाम असा झाला कि, मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत हे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आले. आता तर या मोहिमेला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली आहे. Give Plastic And Take Gold

Give Plastic, Take Gold: अनोखे विचार ने जम्‍मू-कश्‍मीर के गांव को बनाया  प्लास्टिक मुक्त - Give plastic take gold Unique idea makes Jammu Kashmir  village plastic free

या मोहिमेला लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आसपासच्या इतर पंचायतींनीही त्याचे अनुसरण केल्याची माहिती अनेक रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. सध्या आपल्या गावात बक्षीसाच्या बदल्यात पॉलिथिन देण्याचा नारा त्यांनी सुरू केला होता, जो यशस्वी झाल्याचे सरपंच सांगतात. “मी नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता गावातील प्रत्येकाकडून आम्हाला साइट स्वच्छ करण्यास मदत होते आहे. Give Plastic And Take Gold

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…