यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या या खास भेटवस्तू; त्यांच्या कायम राहतील लक्षात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 12 नोव्हेंबर रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण आला आहे. दिवाळी सण आला की, फराळ, फटाके, आनंद, मज्जा आणि भेट वस्तूंची देवाण – घेवाण येतेच. अनेकवेळा आपल्याला दिवाळी सणात प्रियजनांना काय भेटवस्तू द्याव्यात हे सुचत नाही. त्यामुळे आपण सरळ साधा मार्ग वापरून फराळ किंवा मिठाई भेट म्हणून देतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की, असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या आपण सहजरीत्या भेट म्हणून देऊ शकतो. या भेटवस्तू प्रियजनांच्या कायम लक्षातही राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या भेटवस्तू दिवाळीत (Gifts For Diwali) देता येतात.

मातीची पेंट केलेली भांडी – यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही प्रियजनांना सुंदर अशी मातीची भांडी भेट वस्तू म्हणून देऊ शकता. ही भांडी जर तुम्ही तुमच्या हाताने पेंट केली आणि तिला सुंदर अशी नक्षीकृती केली तर या भांड्यांना वेगळी शोभा येते. त्यानंतर हीच भांडी आपण भेट म्हणून दिल्यास समोरच्या व्यक्तीला देखील ती आवडू शकतात. तसेच या भांड्यांचा वापर त्यांना करता येऊ शकतो

फुलांची रोपे द्या – दिवाळीमध्ये काही द्यायचे असेलच तर तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत फुलांची रोपे भेटवस्तू म्हणून देऊ शकता. ही रोपे सहज बाजारात मिळून जातील. यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्चावे लागणार नाही. परंतु अशी एखादी भेट वस्तू तुम्ही दिल्यास समोरील व्यक्ती कायम तुमचे स्मरण करेल.

पुस्तके द्या – नेहमी एखादी महागडी वस्तूच भेटवस्तू द्यावी असा कोणताही नियम आजवर लिहिला गेलेला नाही. त्यामुळे तुम्ही पुढील व्यक्तीला फायदेशीर ठरेल अशी पुस्तके भेट म्हणून देऊ शकता. या पुस्तकांचा फायदा नेहमी तुमच्या जवळील व्यक्तीला होईल. तसेच या पुस्तकांच्या माध्यमातून भेट दिलेल्या व्यक्तीला नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

नविन डायरी द्या – तुम्ही जर तुमच्या मुलांना किंवा शाळेत शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर त्याला एखादी नवीन कोरी डायरी द्या. या डायरीच्या माध्यमातून समोरील व्यक्ती व्यक्त व्हायला आणि लिखाण करायला शिकेल. तसेच या दोन्ही गोष्टीत त्याची प्रगती झाल्यास तो कायम तुम्हाला स्मरणात ठेवेल.

विंड चाइम – विंड चाइम ही दिवाळी देण्यात येणारी सर्वात सुंदर भेटवस्तू आहे. अशी एखादी भेट वस्तू तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला दिल्यात ती नक्कीच त्याला आवडेल. या भेटवस्तूमुळे तुमच्या प्रियजनांच्या घराची शोभा वाढेल. तसेच, घर देखील सुंदर दिसेल.