उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटली, अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: फेब्रुवारी महिन्यात जोशीमठ इथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळील नीती खोऱ्यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे.

नागरिकांसह प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चमोली जिल्ह्यातील नीती खोऱ्यात हिमनदी फुटल्याची माहिती शुक्रवारी रात्री मिळाली. गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री रावत यांना दिली. जिल्हा प्रशासनाला या घटनेची संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले असून उत्तराखंडातील सर्व नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील एनटीपीसी व इतर प्रकल्पांमधील काम थांबवण्यात आले आहे.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात जोशीमठ येथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. त्यात वीज प्रकल्पासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच शेकडो जण बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा हिमनदी फुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment