Share Market : ‘या’ शेअरने 3 दिवसांत घेतली फिनिक्स भरारी; 9% ने वाढली गुंतवणूकदारांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेअर बाजारातील वातावरण हे कधीच एकसारखे नसते . कधी कुठल्या शेअरचा भाव गगनाला भिडेल तर कधी कुठला शेअर जमिनीत लोळण घेईल हे इथे सांगणे तसे कठीणच आहे. ज्याचे ताजे उदाहरण ग्लँड फार्माच्या शेअर्सबद्दल आपण देऊ शकतो. गेल्या तीन दिवसांत तेजीने उतरणाऱ्या ग्लँड फार्माच्या शेअर्सच्या (Gland Pharma Share)  भावात काल अचानक तेजी दिसून आली. मंगळवारी सकाळी कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांपर्यंत वधारले होते . गेल्या 3 दिवसात, फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.तीन दिवस दणकून आपटल्या नंतर आज ग्लँड फार्माच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना बक्कळ पैसे कमवून दिले ह्यात शंका नाही . काल कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 979 रुपये प्रति शेअर होता. दुपारी 12.35 च्या सुमारास बीएसईवर ग्लँड फार्माचे शेअर्स 6.18 टक्क्यांनी वाढून 947.60 रुपयांवर व्यवहार करत होते.

3 दिवसात स्टॉक 30 टक्क्यांनी घसरला

18 मे रोजी ग्लँड फार्माच्या एका शेअरची किंमत 1329 रुपये होती. जी आता 950 रुपयांच्या जवळपास आहे. म्हणजेच, केवळ 3 ट्रेडिंग दिवसांत, कंपनीच्या गुंतवणूकदारांचे प्रति शेअर सुमारे 400 रुपयांचे नुकसान झाले आहे. 18 मे ते 22 मे पर्यंत ग्लॅंड फार्माच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांहून अधिक घसरली होती.

सोमवारी हि ग्लँड फार्माचे शेअर्स 19 टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर जात 861 रुपयांवर आली होती. परदेशी गुंतवणूकदार मॉर्गन स्टॅन्ले यांनी ग्लँड फार्मामधील 0.58 टक्के हिस्सा ओपन मार्केटमध्ये विकला होता. सदर कंपनीत कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा 57.86 टक्के आणि सामान्य गुंतवणूकदारांचा 42.14 टक्के हिस्सा आहे.