आता Petrol गाडीचे Electric मध्ये रूपांतर, खर्चही वाचणार; लाँच झालं ‘हे’ खास किट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चलती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतात पेट्रोलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त भर देत आहे. परंतु या इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती प्रचंड असल्यामुळे काहींना त्या परवडणाऱ्या आहेत तर काहींना त्या परवडत नही. परंतु आता चिंता करू नका. GoGoA1 कंपनीने एक खास असं ईलेक्ट्रिक वाहन कन्व्हर्जन किट (Electric vehicle conversion kit) लाँच केलं आहे. या किटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पेट्रोल दुचाकीच रूपांतर इलेक्ट्रिक गाडी मध्ये करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरटीओने सुद्धा या किटला मंजुरी दिली आहे.

मुंबईमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप GoGoA1 या कंपनीने पेट्रोल वाहनांना इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक किट लॉन्च केलं आहे. या किटच्या माध्यमातून आपण पेट्रोलवाल्या वाहनांना इलेक्ट्रिक वाहनाप्रमाणे वापरू शकता . GoGoA1 या कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितलं की, हे किट सध्या 50 पेक्षा जास्त टू व्हीलरला सपोर्ट करत आहे. यामध्ये हिरो, होंडा, होंडाच्या गाड्यांचा आणि स्कूटरचा देखील समावेश असून एक्टिवा स्कूटर च्या पाच ओरिएंट देखील यामध्ये समाविष्ट आहेत.

आरटीओने सुद्धा दाखवला हिरवा झेंडा

GoGoA1 कंपनीच्या या किटला आरटीओने देखील हिरवा झेंडा दाखवला असून तुम्ही कायदेशीर रित्या पेट्रोल दुचाकी इलेक्ट्रिक मध्ये बदलू शकतात. या किटच्या किमती बद्दल आणि फीचर्स बद्दल अजून माहिती मिळाली नसून कंपनीच्या वेबसाईटनजर टाकल्यास आपण समजू शकतो कि GoGoA1 कंपनीच्या या कन्वर्जन किटची किंमत होंडा एक्टिवा साठी 19000 रुपये असू शकते. याशिवाय 1.6 kwh LFP बॅटरी साठी तीस हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागू शकतात. या किटमध्ये देण्यात आलेली बॅटरी 60 किलोमीटर पर्यंत रेंज देत असून बॅटरीच्या इनबिल्ड loT साठी 5000 रुपये आणि चार्जर साठी 6500 रुपये मोजावे लागू शकतात. एवढेच नाही तर बाईक साठी कन्वजर किटची किंमत 29,999 रुपये असू शकते.

दरम्यान, पेट्रोल गाडीचे इलेक्ट्रिक मध्ये रूपांतर करणाऱ्या या किटबाबत कंपनीचे संस्थापक सीईओ श्रीकांत शिंदे म्हणाले की, आपल्या देशामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन सोल्युशन्स आणणे हे फक्त नाविन्यपूर्ण नसून ते पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यासाठी उपयुक्त आहे. यासोबतच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भाड्याने देणे, सध्याच्या पेट्रोल दुचाकीचे रेट्रोफिकेशन करणे, कौशल्य निर्माण करणे, इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीम साठी रोजगारक्षम पूल तयार करणे यासारख्या पर्यायांसह आम्ही वाहतुकीत बदल करण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.