हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलं असून आता खिशाला कात्री लावणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ (Gokul Milk Price) झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. प्रति लिटर दोन रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात गाईच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. पूर्वी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर होतं ते आता 56 रुपये मोजावे लागणार आहे. खरं तर मुंबई आणि पुण्यातच गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला मोठी मागणी असते. त्यामुळे येथील ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
1 जुलैपासून दरवाढ लागू – Gokul Milk Price
नवीन दरवाढ 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बाकी शहरात राहणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख लिटर विक्री तर पुण्यात भागात 40 हजार लिटर दूधाची विक्री होते. वाढता खर्च आणि दूध पावडरीमधील होणाऱ्या तोट्याचा ताळमेळ घालण्यासाठी सध्या वाढलेल्या दरामुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील इतरही सर्वच दूध संघांनी दरवाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी अमूल (Amul company) आणि पराग कंपनीने (Parag company) दुधाचे दर वाढ केली होती. आता गोकुळ दूधातही दर वाढ (Gokul Milk Price) झाल्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. मात्र गोकुळच्या दरवाढीनंतर शेतकऱ्यांना याचा किती फायदा होतो ते पाहायला हवं, कारण एका बाजुला चाऱ्याच्या, पशुखाद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे दुधाच्या किमतीला मामुली दर मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे.