हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी प्रमाणे यंदा ही 29 ऑक्टोबर 2024 , भारतात धनत्रयोदशी उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातोय . हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो . कारण सोन्याला सुख , शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. संकटकाळातील जवळचा मित्र म्हणून याकडे पाहिले जाते. परंपरेनुसार लोक सोन्याची खरेदी करतात. पण आता याकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. कर्ज काढण्यासाठी ग्राहकाकडे काहीतरी तारण असल्याशिवाय बँक ग्राहकांना कर्ज देत नाही. त्यासाठी सोन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सोन्याच्या वाढत्या किंमती आणि त्यातील गुंतवणुकीच्या फायद्यामुळे लोकांचा सोन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला कशात गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल हे सांगणार आहोत.
सोन्यात गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय
तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. फिजिकल सोन खरेदी करण्यापेक्षा तुम्ही डिजीटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ या पर्यायाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. या पर्यायामुळे भविष्यात सोनं अधिक चांगला नफा मिळवून देऊ शकतो . त्यामुळे याकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
डिजीटल गोल्ड
घरबसल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सोनं खरेदी आणि विक्री करता येते. तसेच काही प्लॅटफॉर्मवर 1 रुपये इतक्या कमी रकमेत सोनं खरेदी करण्याची सुविधा आहे. खरेदी केलेलं डिजिटल गोल्ड सुरक्षित तिजोरीत ठेवले जाते. डिजिटल गोल्डची विक्री आणि खरेदी बाजारातील सध्याच्या दरांनुसार होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना योग्य वेळेत व्यवहार करण्याची संधी मिळते. डिजिटल गोल्ड हा एक नवीन आणि सोयीस्कर पर्याय म्हणून उदयास आला आहे.
गोल्ड ईटीएफ
गोल्ड ईटीएफ म्हणजे सोन्यात गुंतवणुकीचा आणखी एक सोपा पर्याय आहे. हे डीमॅट अकाउंटमध्ये ठेवले जाते, आणि शेअरप्रमाणे खरेदी विक्री करता येते. गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडाच्या स्वरुपात असते आणि याच्या युनिटचा अर्थ एक ग्रॅम सोनं . कमी रकमेसह देखील तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. स्टॉक मार्केटमधून सोनं विकत घेणे किंवा विकणे सोपे असल्याने, गोल्ड ईटीएफ आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणे फक्त परंपरा नव्हे, तर आर्थिक सुरक्षा आणि चांगल्या परताव्याचा मार्गही आहे.