Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर चांदी देखील महागली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 118 रुपयांची किंचित वाढ तर चांदीच्या दरात 924 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (19 डिसेंबर ते 23 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 54,248 होता, जो शुक्रवारपर्यंत 54,366 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 66,898 रुपयांवरून 67,822 रुपये प्रति किलो झाली आहे. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

19 डिसेंबर 2022 – 54,248 रुपये प्रति 10 ग्रॅम
20 डिसेंबर 2022 – 54,505 रुपये प्रति 10 ग्रॅम
21 डिसेंबर 2022 – 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 डिसेंबर 2022 – 54,699 रुपये प्रति 10 ग्रॅम
23 डिसेंबर 2022 – 54,366 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

19 डिसेंबर 2022 – रुपये 66,898 प्रति किलो
20 डिसेंबर 2022 – रुपये 67.849 प्रति किलो
21 डिसेंबर 2022 – रुपये 68,177 प्रति किलो
22 डिसेंबर 2022 – रुपये 67,605 प्रति किलो
23 डिसेंबर 2022 – रुपये 67,822 प्रति किलो

सोन्याच्या किंमती आणखी वाढणार

कमोडिटी मार्केट मधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविडची पुन्हा भीती आणि डॉलरच्या निर्देशांकातील नरमाईमुळे सोन्याच्या किंमती वाढतच आहेत. ते पुढे म्हणाले की,” अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विस्तारानंतर जागतिक आर्थिक मंदीची भीतीही कमी झाली आहे. मात्र, सोन्याच्या किंमतींमध्ये व्हॉल्यूम कमी राहण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे नजीकच्या काळात ‘साइड वेज टू पॉझिटिव्ह’ म्हणजेच किंचित उतारासह पिवळा धातू वरचा ट्रेंड राखेल अशी अपेक्षा आहे.” Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
Jandhan Account : जनधन खातेधारकांना झिरो बॅलन्सवरही मिळेल 10,000 रुपयांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Travel Insurance : रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले किंवा चोरीला गेल्यावरही करता येतो क्लेम, जाणून घ्या त्याविषयीचे नियम