Gold Price Today: खुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सोन्या – चांदीच्या भावामध्ये दररोज चढउतार पाहिला मिळत आहेत. अशा काळामध्येच सोने नक्की कधी खरेदी करावे? असा प्रश्न अनेक खरेदीदारांना पडला आहे. याच खरेदीदारांसाठी आज एक खुशखबर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीचे भाव उतरले आहेत. यापूर्वी सोने 64 हजारांवर व्यवहार करत होते. आज मात्र सोन्याच्या किमती घसरत त्या 63 हजारांवर आले आहेत. तसेच आज चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत.

शनिवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहक दिलखुलासपणे आज सोन्याची खरेदी करू शकतात.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये

चांदीचे भाव

सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 750 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,500 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,000 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीचे भाव 755 , 7,550,75,500 रुपयांनी व्यवहार करत होते.