Gold Price Today: सोन्याचे भाव पुन्हा घसरले; मात्र चांदी, प्लॅटिनमच्या किमतीत मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सोने चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज देखील सोन्याचे भाव उतरले आहेत. गेल्या एक-दीड महिन्यापासून सोन्या चांदीचे भाव वाढले होते. मात्र आता या भावात हळूहळू घसरण होताना दिसत आहे. शनिवार नंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे असे ग्राहक बिनधास्तपणे आज सराफ बाजारात जाऊन सोन्याची खरेदी करू शकतात.

Good Return वेबसाईटनुसार सोमवारी, सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,840 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,830 रुपये एवढी सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,840 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,830 रुपये सुरू आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,840 रुपये
मुंबई – 54,840 रुपये
नागपूर – 54,840 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,830 रूपये
मुंबई – 59,830 रूपये
नागपूर – 59,830 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

सोमवारी सोन्याचे भाव घसरले असले तरी मात्र चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदी 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,400 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1 हजार ग्रॅम चांदी 74,000 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करण्यासाठी चांगला असला तरी चांदी खरेदी करणे ग्राहकांना परवडणार नाही.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

चांदीसोबत आज प्लॅटिनमच्या किमती देखील वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,200 वरून 23,830 रुपयांवर आली आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,38,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच सोमवारी प्लॅटिनमच्या किमती देखील गगणाला भिडल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे सोन्याचे भाव उतरले असताना चांदी आणि प्लॅटिनमच्या किमती आज वाढल्या आहेत.