Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचा आजचा भाव काय? लगेच पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारात मोठ्या उलाढाली होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold Price Today) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याच्या किमतींनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करण्यासाठी अतिशय योग्य आहे. मात्र आज चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांना फटका बसू शकतो.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 5,769 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 6,294 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहक दिलखुलासपणे आज सोन्याची खरेदी करू शकतात.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये

चांदीचे भाव

आज चांदीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खरेदी करत्यावेळी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोमवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीचे भाव 10 ग्रॅम -750, 100 ग्रॅम-7500, 1000 ग्रॅम-7500 रुपयांनी व्यवहार करत होते.