खुशखबर! सोन्या-चांदीचे भाव उतरले; ग्राहकांनी खरेदीची संधी सोडू नका; पहा आजच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | राज्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी भक्तलोक बाजारात जाऊन फुलांची, डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, या काळात सोन्याचे गणपती बनवून घेण्यास देखील जास्त प्राधान्य दिले जाते. यामुळे सध्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. चला तर मग पाहूयात आजच्या सोन्या-चांदीच्या किमती!

Good Return वेबसाईटनुसार बुधवारी, सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,500 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,450 रुपये एवढी सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,450 रुपये सुरू आहे.

Gold Price Today

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

बुधवारी 10 ग्रॅम चांदी 735 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,350 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1 हजार ग्रॅम चांदी 73,500 रुपये भावाने सुरू आहे. सलग दोन महिन्यानंतर आज चांदीचे भाव देखील उतरले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

सोन्या चांदीचे भाव कमी झाले असले तरी आज प्लॅटिनमच्या किमती वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,830 वरून 24060 रुपयांवर आली आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,40,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज प्लॅटिनम खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते.