Gold Price Today: आज रंगपंचमी सण. यानिमित्ताने अनेकजण सोने खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस किंचित महाग ठरू शकतो, कारण बाजारात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे दर सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर आहेत.
सोन्याच्या किमतीत वाढ लक्षणीय वाढ (Gold Price Today)
आज 14 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 1,200 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,930 रुपये झाली आहे. तर 100 ग्रॅमसाठी ग्राहकांना 8,99,300 रुपये मोजावे लागतील.
22 कॅरेट सोन्याचे दर
• 1 ग्रॅम: 8,245 रुपये • 10 ग्रॅम (1 तोळा): 82,450 रुपये • 100 ग्रॅम: 8,24,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचे दर
• 1 ग्रॅम: 8,993 रुपये • 10 ग्रॅम: 89,930 रुपये • 100 ग्रॅम: 8,99,300 रुपये
राज्यातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
सणासुदीच्या दिवशी राज्यातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरात वाढ (Gold Price Today) दिसून आली आहे.
- मुंबई: 22 कॅरेट – 8,230 रुपये (1 ग्रॅम),
- 24 कॅरेट – 8,978 रुपये (1 ग्रॅम)
- पुणे: 22 कॅरेट – 8,230 रुपये (1 ग्रॅम),
- 24 कॅरेट – 8,978 रुपये (1 ग्रॅम)
- जळगाव: 22 कॅरेट – 8,230 रुपये (1 ग्रॅम),
- 24 कॅरेट – 8,978 रुपये (1 ग्रॅम)
सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) चढ-उतार दिसून येत आहेत. याला कारण अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील बदल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही काळ वाट बघावी लागणार आहे. मात्र गुंतवणूकदारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरू शकते.