Gold Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव सुसाट!! ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today: 2024 च्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावांमध्ये (Gold Price Today) चांगली घट पाहिला मिळाली होती. परंतु मार्च महिन्याला सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत गेली. आता सोने हे 74 हजारच्या घरात पोहोचले आहे तर 1000 ग्रॅम चांदी 87,000 हजाराने व्यवहार करत आहे. त्यामुळे सोने चांदीचे भाव कधी कमी होतील याची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आजही (मंगळवारी) सोने चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी आजचे भाव तपासून.

मंगळवारी Good Return नुसार, 16 एप्रिल रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 67,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 74,130 रुपयांवर पोहचले आहे. MCX नुसार आजचे सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, आज 73,958 रुपयांनी सोने बाजारात व्यवहार करत करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याचे भाव उतरेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 67,950 रुपये
मुंबई – 67,950 रुपये
नागपूर – 67,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,130 रूपये
मुंबई – 74,130 रूपये
नागपूर – 74,130 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज Good Return नुसार, 10 ग्रॅम चांदीचा भाव 870 रुपयांनी व्यवहार (Gold Price Today) करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8700 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 87,200 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीचे भाव 85,000 रुपयांनी व्यवहार करत होते. मात्र आता या भावात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.