Gold Price Today: सोने चांदीचे दर घसरले; संधीचा लाभ घेण्यासाठी आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. कारण सोन्याचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये दागिने खरेदी करता येत आहेत. तसेच चांदीच्या किंमती ही उतरल्यामुळे चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. गुरुवारी सोने चांदीच्या किमती उतरल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे. यामध्ये तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे भाव तपासून घ्या.

गुरुवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,620 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,400 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,620 रुपयांनी व्यवहार करत आहे. या किमतींमध्ये आणखीन घसरण होईल असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,400 रुपये
मुंबई – 57,400 रुपये
नागपूर – 57,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,620 रूपये
मुंबई – 62,620 रूपये
नागपूर – 62,620 रूपये

Gold Price Today

चांदीचे भाव

गुरुवारी चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 अशी आहे. यापूर्वी चांदी 780 भावांनी व्यवहार करत होती.

सोने खरेदी करताना शुद्धता तपासा

सराव बाजारात सोने खरेदी करायला गेल्यानंतर कधीही सोन्याची शुद्धता व्यवस्थित रित्या तपासावी. यासाठी सर्वात प्रथम दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते पहावे. कारण, 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणे नियमांच्या बाहेर बसते.