Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या भावात वाढ की घसरण? पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| लग्नसराईचा काळ सुरू झाला की सोन्या-चांदीच्या भावांकडे सर्वांचे लक्ष असते. सर्व ग्राहक सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) कमी होण्याचीच वाट पाहत असतात. अशा ग्राहकांना माहीत असायला हवे की, आजचे सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीच्या किमतींनी देखील उच्चांकाची पातळी गाठली आहे. गेली सलग चार-पाच दिवस सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या होत्या. आता मात्र या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे भाव तपासून घ्या.

सोमवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,670 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,450 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,670 रुपयांनी व्यवहार करत आहे. म्हणजेच सोन्याचे भाव (Gold Price Today) 62 हजारांच्या वर गेले आहेत.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,450 रुपये
मुंबई – 57,450 रुपये
नागपूर – 57,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,670 रूपये
मुंबई – 62,670 रूपये
नागपूर – 62,670 रूपये

चांदीचे भाव

सोमवारी सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. कारण आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,000 रूपये अशी आहे. त्यामुळे आज ग्राहकांना चांदीची खरेदी करता येणार आहे, तर सोन्याच्या किमती (Gold Price Today) कमी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.