Gold Price Today: पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात तेजी; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोन्या चांदीच्या वाढत्या भावांनी (Gold Price Today) ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. कारण लग्नसराईच्या काळात ही सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज पुन्हा एकदा याच भावांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करताना चार पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. तुम्ही देखील जर सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासा.

मंगळवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,330 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,800 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,330 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60,800 रुपये
मुंबई – 60,800 रुपये
नागपूर – 60,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,330 रूपये
मुंबई – 66,330 रूपये
नागपूर – 66,330 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्याचेच नव्हे तर चांदीचे दर देखील उंचावले (Gold Price Today) आहेत. कारण की, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 773 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,730 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,300 रूपये अशी आहे. यापूर्वी फक्त सोन्याच्या नव्हे तर चांदीच्या भावामध्ये देखील घसरण झाली होती. परंतु, आता हेच भाव वाढत चालले आहेत.