Gold Price Today: खुशखबर! सोन्या-चांदीच्या भावात घसरण; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सध्या लग्न सराईचा काळ सुरू आहे. अशा काळातच सोने चांदी खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देतात. याचं ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, मंगळवारी सोन्या चांदीच्या किंमती (Gold Price Today) उतरल्या आहेत. त्यामुळे आता सोने खरेदी करताना ग्राहकांना पैशांचा विचार करावा लागणार नाही. यापूर्वी सोन्याच्या किंमतींनी उच्चांकाची पातळी गाठली होती. त्यामुळे सोन्या चांदीचे भाव कमी होण्याची ग्राहक प्रतीक्षा करत होते.

मंगळवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,560 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,350 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,560 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी हेच सोन्याचे भाव 63 हजारांवर व्यवहार करत होते.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,350 रुपये
मुंबई – 57,350 रुपये
नागपूर – 57,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,560 रूपये
मुंबई – 62,560 रूपये
नागपूर – 62,560 रूपये

चांदीचे भाव

मंगळवारी सोन्यासह चांदीचे भाव (Gold Price Today) देखील कमी झाले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फक्त सोनेच नव्हे चांदीची ही एकाचवेळी खरेदी करता येणार आहे.
.