Gold Price Today| सोन्या चांदीच्या भावांमध्ये घसरण व्हावी याची, ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र तरी देखील सोन्याच्या किमती कमी झालेल्या दिसत नाही. कारण आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी योग्य दरात खरेदी करता येणार आहे. परंतु त्यापूर्वी आजचे भाव तपासून घ्या.
शनिवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोने खरेदी केल्यास ग्राहकांना फटका बसू शकतो.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,800 रुपये
मुंबई – 57,800 रुपये
नागपूर – 57,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,050 रूपये
मुंबई – 63,050 रूपये
नागपूर – 63,050 रूपये
चांदीचे भाव
आज सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या भावात घसरण झाली आहे. कारण की , 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 अशी आहे. बऱ्याच काळानंतर चांदीच्या किमतीत मध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.