Gold Price Today: श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी सोन्या-चांदीचे भाव काय? तपासून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आज आयोध्यमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने सोने-चांदी खरेदीवर ही जास्त भर देण्यात आहे. मात्र या शुभ दिवशीच ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण सोमवारी सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी त्यांचे भाव तपासा.

सोमवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांना आणखीन चार पैसे मोजावे लागणार आहेत.

Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,800 रुपये
मुंबई – 57,800 रुपये
नागपूर – 57,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,050 रूपये
मुंबई – 63,050 रूपये
नागपूर – 63,050 रूपये

Gold Price Today

चांदीचे भाव

आज चांदीच्या भावामध्ये देखील घसरण झालेली नाही. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 अशी आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील झालेल्या दिसत आहे.