Gold Price Today: सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींना ब्रेक; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आज सोने चांदी खरेदीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही काळापासून सोन्या चांदीचे भाव (Gold Price Today) वाढल्यामुळे याचा ग्राहकांना मोठा फटका बसला होता. आता मात्र सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. तसेच, सोने चांदी व्यवहार मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज म्हणजेच शुक्रवारी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे भाव तपासून घ्या.

शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,730 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,500 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,730 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकाला दिलखुलासपणे सोने खरेदी करता येणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,500 रुपये
मुंबई – 57,500 रुपये
नागपूर – 57,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,730 रूपये
मुंबई – 62,730 रूपये
नागपूर – 62,730 रूपये

चांदीचे भाव

शुक्रवारी सोन्यासह चांदीचे भाव (Gold Price Today) देखील कमी झाले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,500 रूपये अशी आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावांवर होत आहे. त्यामुळेच आज सोन्या चांदीचे भाव देखील उतरले आहेत.