Gold Price Today: सोन्याच्या भावामध्ये किंचित घसरण तर चांदीचे दर काय? खरेदीपूर्वी पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अमेरिकेमधील फेडरल रिझर्व्हने उच्च व्याजदर कायम ठेवल्यामुळे जगभरात सोन्या-चांदीचे (Gold Price Today) भाव कडाडले आहेत. 60 हजारापर्यंत व्यवहार करणारे सोन्याचे भाव 66 हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु खास बाब म्हणजे, शनिवारी सोन्या-चांदीच्या भावाला उतरती कळा लागली आहे. आजचे आपण सोन्या-चांदीचे भाव पाहिला गेलो तर, त्यामध्ये किंचीत घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव वाढले आहेत.

शनिवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,820 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,250 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,820 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना काही प्रमाणात सोने खरेदी करणे परवडू शकते.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,250 रुपये
मुंबई – 61,250 रुपये
नागपूर – 61,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,820 रूपये
मुंबई – 66,820 रूपये
नागपूर – 66,820 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज सोन्याचे कमी (Gold Price Today) झाले असले तरी चांदीच्या भावामध्ये वाढ झाली आहे. शनिवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 775 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,750 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,500 रूपये अशी आहे. यापूर्वी सोन्याचे भाव 72 हजारांच्या खाली व्यवहार करत होते. परंतु मार्च महिना सुरू झाल्यापासून या भावामध्ये तेजीने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.