Gold Price Today : सोन्या-चांदीचा भाव कडाडला!! खरेदीपूर्वी आजच्या किमती नक्की तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | गणेशोत्सवाच्या निमित्ताने सराफ बाजारातील सोन्या चांदीच्या किमती घटल्या होत्या. मात्र आता या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. आज (शनिवारी) सोन्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करणे ग्राहकांच्या परवडण्याबाहेर जाऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून याच सोन्याच्या किमती घसरल्या होत्या. त्यामुळे सराफ बाजारात देखील ग्राहकांची लगबग पाहायला मिळत होती. मात्र आता या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती (Gold Price Today) वाढल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,950 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,040 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,040 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे MCX चे आजचे भाव शुक्रवार प्रमाणेच स्थिर आहेत.

Gold Price TodayGold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 54,950 रुपये
नागपूर – 54,950 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

शनिवारी सोन्याच्या किमतींसह चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील वाढले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 758 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 75,580 रुपये भावाने विकली जात आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्यासोबत चांदी खरेदी करणे ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या बदलांमुळे चांदीच्या किमतीत देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

प्लॅटिनम किंमती

आज सर्वच मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. आजच्या दिवशी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24 हजार 720 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,47,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्लॅटिनम खरेदी शक्यतो ग्राहकांनी टाळावेच.