Gold Price Today: सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल; खरेदीपूर्वी आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सध्या महागाईचा काळ सुरू असला तरी ग्राहक सोने-चांदी खरेदी करणे सोडत नाहीयेत. त्यामुळेच सराफ बाजारात देखील ग्राहकांची खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. मात्र आता ग्राहकांना ही खरेदी करताना मोठा फटका बसणार आहे. कारण, आज सोन्या-चांदीच्या भावात तेजीने (Gold Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करताना आपला हात आकडता घ्यावा लागणार आहे. तसेच, सर्वात प्रथम आजचे सोन्या चांदीचे भाव तपासावे लागणार आहेत.

शनिवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याचे भाव 200 रुपयांनी घसरले होते.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये

चांदीचे आजचे भाव

शनिवारी सोन्याचेच नव्हे तर चांदीचेही भाव (Gold Price Today) देखील वाढले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 749 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,490 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,900 रूपये अशी आहे. मात्र चांदीचे भाव वाढले असले तरी ग्राहकांचा चांदी खरेदीवर जास्त कल असलेला पाहायला मिळत आहे.