Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव दणक्यात आपटले; पहा आजच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी एक खुशखबर आली आहे. सलग वाढत्या किमतींना ब्रेक लावत आज सोन्या-चांदीचे भाव दणक्यात घसरले आहेत. यापूर्वी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजीने वाढ दिसून आली होती. आता याच किमती हळूहळू उतरताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलखुलासपणे लग्नसराईसाठी सोन्या-चांदीची खरेदी करता येणार आहे. कारण, आज 63 हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. तर चांदी 400 रुपयांनी उतरली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,840 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,840 रुपयांनी व्यवहार करत आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,600 रुपये
मुंबई – 57,600 रुपये
नागपूर – 57,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,840 रूपये
मुंबई – 62,840 रूपये
नागपूर – 62,840 रूपये

चांदीचे आजचे भाव

आनंदाची वार्ता म्हणजे सोन्यासह चांदीच्या किमतींमध्ये देखील घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,500 रूपये अशी आहे. म्हणजेच 10 ग्रॅम चांदी -4 रुपयांनी, 100 ग्रॅम चांदी -40 रुपयांनी आणि 1000 ग्रॅम चांदी -400 रुपयांनी घसरली आहे.