Gold Price Today: खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाई नंतर सोन्या-चांदीच्या भावांमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याचाच परिणाम बघता गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी चांगली संधी मिळाली आहे. आज पुन्हा एकदा म्हणजेच मंगळवारी सोन्या-चांदीचे भाव उतरले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात सोने चांदीच्या व्यवहारात मोठी उलाढाल होत आहे. यात तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचे भाव तपास.

मंगळवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,840 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,840 रुपयांनी व्यवहार करत आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,600 रुपये
मुंबई – 57,600 रुपये
नागपूर – 57,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,840 रूपये
मुंबई – 62,840 रूपये
नागपूर – 62,840 रूपये

चांदीचे आजचे भाव

तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतींमध्ये देखील घसरण पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,400 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,000 रूपये इतकी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दिलखुलासपणे सोन्यासह चांदीची खरेदी करता येणार आहे.