Gold Price Today : ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी!! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव आपटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या चार दिवसांपासून चढ उतार होणाऱ्या सोन्या चांदीच्या भावांमध्ये आज घट झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या जून महिन्यापासून सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र आता सोन्याच्या किमती कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी जमली आहे.

बुधवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती (Gold Price Today) कमी झाल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,500 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,500 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज दोन्ही वेबसाईटवर सोन्या-चांदीचे भाव समान आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today) 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,500 रुपये
मुंबई – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रूपये
मुंबई – 59,450 रूपये
नागपूर – 59,450 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासोबत चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील उतरले आहेत. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 742 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,420 रुपये भावाने विकली जात आहे. तसेच, 1000 ग्रॅम चांदी 74,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. चांदीच्या किमती देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्लॅटिनमची किंमत

आजचे आपण प्लॅटिनमचे भाव पाहिला गेलो तर प्लॅटिनमच्या किमतीही कमी झाल्या आहेत. बुधवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,140 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,41, 400 रुपयांनी व्यवहार करत आहे. मौल्यवान प्लॅटिनमची किंमत देखील कमी झाल्यावर आज ग्राहक दागिने खरेदी करण्यावर जास्त भर देऊ शकतात.