Gold Price Today: सोन्या चांदीच्या किमती उतरल्या; पहा आजचे भाव काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सोने चांदी खरेदीसाठी आजचा सुवर्ण दिवस आहे. कारण आज सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी किमतीपेक्षा खाली उतरले आहे. सध्या देश पातळीवर मंदी सुरू असल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) वाढायचे नाव घेत नाहीयेत. याचाच फायदा ग्राहकांना होत आहे. आज म्हणजेच बुधवारी सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव 100 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

बुधवारचे सोन्याचे भाव (Gold Price Today) पाहायला गेलो तर, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,590 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,830 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,590 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,830 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी हेच सोन्याचे भाव 63,000 वर गेले होते. मात्र यात आता घसरण होत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,590 रुपये
मुंबई – 57,590 रुपये
नागपूर – 57,590 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,830 रूपये
मुंबई – 62,830 रूपये
नागपूर – 62,830 रूपये

चांदीचे आजचे भाव

इतकेच नव्हे तर, आज चांदीचे भाव ही आपटले आहेत. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 739 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,390 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 73,900 रूपये अशी आहे. ज्याने आज ग्राहकांना चांदी स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.