बाप्पा पावला! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती उतरल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today
Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | आज अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव देखील उतरले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भागात घट होताना दिसत आहे. त्यानुसार, आज देखील सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्याचबरोबर, आज मौल्यवान चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे सोन्या चांदीचे भाव किती रुपयांमध्ये व्यवहार करत आहेत.

गुरूवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,900 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,900 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज दोन्ही वेबसाईटवर सोन्या-चांदीचे भाव समान आहेत.

Gold Price Today

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 53,900 रुपये
मुंबई – 53,900 रुपये
नागपूर – 53,900 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,800 रूपये
मुंबई – 58,800 रूपये
नागपूर – 58,800 रुपये

चांदीचे आजचे भाव

आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासोबत चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 737 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,370 रुपये भावाने विकली जात आहे. तसेच, 1000 ग्रॅम चांदी 73,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज चांदीच्या किमती देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today

प्लॅटिनमची किंमत

आनंदाची बातमी म्हणजे, आज प्लॅटिनमच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. गुरूवारी, 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,710 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,37, 100 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मौल्यवान धातूंची खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.