Gold Price Today: सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ; आजच्या किंमती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. बचतीसाठी असो किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे कमवायचे असो यासाठी पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यात येते. त्यामुळेच नेहमी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासून घ्या. कारण आज सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) लक्षणीय वाढ झाली आहे.

मंगळवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 64,850 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,450 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 64,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याचे हे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीसाठी आता वाट पाहावी लागणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 59,450 रुपये
मुंबई – 59,450 रुपये
नागपूर – 59,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 64,850 रूपये
मुंबई – 64,850 रूपये
नागपूर – 64,850 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज सोन्यासह चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 747 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,470 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,700 रूपये अशी आहे. यापूर्वी सोन्याच्या आणि चांदीच्या किमती घसरल्या होत्या. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच या धातूंच्या भावात वाढ झाली आहे.