Gold Price Today| महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. दिवाळीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आतापासूनच ग्राहक सोने खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. सध्या सराफ बाजारात सोन्याचे भाव देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा जास्त मिळाला आहे. आज बऱ्याच दिवसांनी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात सोन्याचे आजचे भाव..
Good Returns नुसार सोमवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपयांनी )Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,670 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,470 रुपयांनी व्यवहार करत आहे. यापूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील सोन्याच्या किमती कमी झाल्या नव्हत्या. मात्र आता दिवाळी जवळ येत असताना सोन्याच्या किमती घसरत आहेत.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,350 रुपये
मुंबई – 56,350 रुपये
नागपूर – 56,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,470 रूपये
मुंबई – 61,470 रूपये
नागपूर – 61,470 रुपये
चांदीचे भाव
सोमवारी एकीकडे सोन्याचे भाव (Gold Price Today) उतरले असताना चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 752 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,520 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,200 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते.
प्लॅटिनमची किंमत
आनंदाची बाब म्हणजे, आज प्लॅटिनमच्या किमती घसरल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,47,600 असा सुरू आहे. त्यामुळे सराफ बाजारात प्लॅटिनम नेकलेस, प्लॅटिनम रिंग आणि इयरिंग्स अशा दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे.