ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सराफ बाजारातील सोने – चांदीचे भाव उतरण्याचे ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या भावांनी उच्चांकाची पातळी गाठली होती. त्यामुळे ग्राहकांना सोने चांदी नक्की कधी खरेदी करावे असा प्रश्न पडला होता. मात्र आता ग्राहकांना दिलासा देणारी सराफ बाजारातून एक बातमी समोर आली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सराफ बाजारातील सोने चांदीचे भाव उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असणाऱ्या सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य मानला जात आहे.

MCX नुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,820 असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,900 रूपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, मात्र गुडरिटर्न्सनुसार, मंगळवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,050 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,060 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोने 100 ग्रॅमने 5,50,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातून आजचे सोन्याचे भाव घसरलेले दिसत आहेत.

जागतिक पातळीवर चांदीचे आजचे भाव देखील नरमलेले आहेत. सोमवारी सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 750 रुपये असा सुरू होता. मात्र आज 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 740 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे सोमवारच्या दरानुसार आज चांदीच्या भावात 100 रुपयांचा फरक पडला आहे. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे सोने चांदीच्या किमतीत दररोज बदल होताना दिसत आहेत. मात्र आज मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,050 रुपये
मुंबई – 55,050 रुपये
नागपूर – 55,050 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,060 रूपये
मुंबई – 60,060 रूपये
नागपूर – 60,060 रुपये

दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.