Gold Price Today: पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; खरेदीदारांना मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्या चांदीच्या भावामध्ये घसघशीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींनी उसळी मारली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. मागच्या काही तासांमध्ये सोन्याच्या भावात (Gold Price Today) दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर आज सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. त्यामुळेच खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आजचे सोन्या-चांदीचे भाव तपासून घ्यावे.

शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65,730 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,250 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65,730 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याचे हे भाव (Gold Price Today) वाढल्यामुळे ग्राहकांना लग्नसराईच्या काळात मोठा फटका बसणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60,250 रुपये
मुंबई – 60,250 रुपये
नागपूर – 60,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 65,730 रूपये
मुंबई – 65,730 रूपये
नागपूर – 65,730 रूपये

चांदीचे आजचे भाव

या काळामध्ये फक्त सोन्याचेच नाही (Gold Price Today) तर चांदीचे भाव देखील वाढले आहेत.आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्या चांदीचे भाव उतरेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.