Gold Price Today : सोन्याच्या किमती उसळल्या मात्र चांदीच्या भावात मोठी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरी करण्यात येतात. या काळात सोने-चांदीचे खरेदी ही तितक्याच प्रमाणात केली जाते. मात्रयंदाच्या श्रावण महिन्यात ग्राहकांना आपला हात थोडा आकडून ठेवावा लागणार आहे. कारण की ऑगस्टपासून ते आजच्या दिवसापर्यंत सोन्या – चांदीचे भाव मोठ्या किमतींनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या महागाईमुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

Good Return वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव (Gold Price Today)  पुन्हा एकदा वाढले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 55,000 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 60,000 रुपये एवढी सुरू आहे. MCX वेबसाईटनुसार, शुक्रवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 55,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,000 रुपये सुरू आहे. या दोन्ही वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती सम असून त्या वाढल्या आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,000 रुपये
मुंबई – 55,000 रुपये
नागपूर – 55,000 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,000 रूपये
मुंबई – 60,000 रूपये
नागपूर – 60,000 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

एकीकडे सोन्याचे भाव वाढले असले तरी आज मात्र चांदीचे भाव स्थिर आहेत. गुरूवारी चांदी (Gold Price Today)  काही प्रमाणात स्वस्त झाली होती त्यामुळे आज देखील चांदीचे हे भाव स्थिर आहेत. ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची आहे ते ग्राहक आज देखील चांदीची खरेदी करू शकतात. शुक्रवारी 10 ग्रॅम चांदी 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7400 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी 74,000 रुपये भावाने सुरू आहे

प्लॅटिनमची किंमत

आजचे आपण प्लॅटिनमचे भाव बघायला गेलो तर, मौल्यवान प्लॅटिनमच्या किमती उतरल्या आहेत. शुक्रवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,200 रुपये अशी आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,42,000 रुपये सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस प्लॅटिनमची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अगदी योग्य आहे.